Published On : Tue, Aug 29th, 2017

नागपूर-मुंबई दुरांतोच्या इंजिनसह 9 डबे घसरले

Advertisement

नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे 9 डबे घसरुन अपघात झाला आहे. कल्याणमध्ये आसनगाव आणि वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली. अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी असल्याची माहिती आहे.

नागपूरहून मुंबईला येणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसचं इंजिन आणि चार डबे घसरले. आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकांदरम्यान सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. एक्स्प्रेसचं इंजिन डब्यावरुन घसरुन उलट पडलं, तर ट्रेनचे डबे मार्ग सोडून आजूबाजूच्या झुडपात शिरले.

A1, A2, A3 हे डबे घसरल्याचं एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी सांगितलं. अपघाताच्या वेळी ट्रेनचा वेग कमी
असल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकखालील खडी आणि माती वाहून गेल्याचा अंदाज आहे. यामुळेच रुळावरुन डबे घसरुन ट्रेनचा अपघात घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चार डबे घसरल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी पाच ते सहा तास हा मार्ग बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या
मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम होण्याची चिन्हं आहेत.

हेल्पलाईन

सीएसटीएम 022-22694040,

ठाणे 022-25334840,

कल्याण 0251– 2311499,

दादर 022-24114836,

नागपूर 0712-2564342

रेल्वे प्रशासन घटनास्थळी गेल्यावर घसरलेले रेल्वेचे डबे हटवण्याचं काम सुरु करेल, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारीचे ए. के. जैन यांनी दिली आहे. दुरांतो एक्स्प्रेस घसरल्याच्या तासाभरानंतरही रेल्वे प्रशासनातर्फे कोणीही घटनास्थळी पोहचलं नसल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.

अडकलेल्या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कल्याणवरुन बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे किरकोळ जखमा झालेल्या प्रवाशांवर उपचारांसाठी डॉक्टरांची टीम रवाना झाली आहे.

व्हिडिओ: