Published On : Wed, Apr 29th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ड्रग्सविरोधी कारवाई ;“ऑपरेशन थंडर”मध्ये कुख्यात गुन्हेगाराला अटक

Advertisement

नागपूर : शहरात सुरू असलेल्या ड्रग्सविरोधी मोहिमेत अजनी पोलीस ठाणे यांनी प्रभावी कारवाई करत “ऑपरेशन थंडर” अंतर्गत मोठं यश मिळवलं आहे. एमडी ड्रग्ससह एका कुख्यात गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे शहरातील नशा तस्करीवर मोठा आघात बसल्याचं मानलं जात आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चिमणी चौक, ठवरे स्कूल परिसरात एक आरोपी ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित तरुणाला ताब्यात घेतलं.

Gold Rate
Apr 30- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,49,400 /-
Gold 22 KT ₹ 1,38,900 /-
Silver/Kg ₹ 2,38,200/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चौकशीत त्याने आपलं नाव हर्षल राकेश ब्राम्हणे (रा. सोनेगाव) असल्याचं सांगितलं. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे १९ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून ६ मोबाईल फोन, एक दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

विशेष म्हणजे, आरोपीवर यापूर्वी खूनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. त्यामुळे तो सराईत गुन्हेगार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

सध्या पोलिसांकडून ड्रग्सचा पुरवठा नेमका कुठून होत होता आणि कोणत्या जाळ्याशी त्याचा संबंध आहे, याचा सखोल तपास सुरू आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement