नागपूर– शहरात आज जिल्हा वकील संघाच्या निवडणुका शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर वकिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या निवडणुकीत वकिलांनी मोठ्या संख्येने आपला मतदानाचा हक्क बजावला असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. वकील आपल्या-आपल्या उमेदवारांना पाठिंबा देताना उत्साहित दिसत होते.
या निवडणुकीत अनेक पदांसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. विशेषतः अध्यक्षपदासाठी नितीन देशमुख, प्रकाश जायसवाल, सुनील लाचरवार, राजेश नायक, तरुणकुमार परमार आणि मनोज साबळे हे उमेदवार मैदानात आहेत.
मतदान प्रक्रिया पूर्णपणे शांततेत पार पडली असून कोणताही अनुचित प्रकार समोर आलेला नाही. आता सर्वांचे लक्ष उद्या, २५ एप्रिल रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. मतमोजणीनंतर सर्व पदांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत.
दरम्यान, यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





