Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरला मिळणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश!

Advertisement


नागपूर : नागपूरला आंतरराष्ट्रीय परिषद, प्रदर्शन आणि व्यावसायिक कार्यक्रमांचे प्रमुख केंद्र बनविण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. नागपूरमध्ये जागतिक दर्जाचे बहुउद्देशीय कन्व्हेन्शन आणि एक्झिबिशन सेंटर उभारण्यात येणार असून, हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प २०२९ पर्यंत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आढावा बैठकीत या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे प्रतिनिधी तसेच फिरा बार्सिलोना इंटरनॅशनल कंपनीचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, नागपूर विमानतळ परिसराच्या विकास आराखड्याशी सुसंगत पद्धतीने कन्व्हेन्शन सेंटर विकसित करण्यात येईल. विमानतळ, रेल्वे आणि रस्ते या तिन्ही वाहतूक सुविधांचा लाभ लक्षात घेऊन या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे देश-विदेशातील मोठ्या परिषद, प्रदर्शन, उद्योग परिषद आणि व्यावसायिक कार्यक्रम नागपुरात आयोजित करणे शक्य होईल.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्यांनी कन्व्हेन्शन सेंटरची वास्तुरचना आकर्षक, अत्याधुनिक आणि पर्यावरणपूरक असावी, अशी सूचना केली. ऊर्जा बचत, हरित तंत्रज्ञान आणि पर्यावरण संवर्धनाच्या संकल्पनांचा प्रभावी वापर करून हा प्रकल्प उभारण्यात यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पामुळे पर्यटन, हॉटेल व्यवसाय, इव्हेंट मॅनेजमेंट, मीडिया आणि सेवा क्षेत्राला मोठी चालना मिळेल, तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला. नागपूरला जागतिक दर्जाचे परिषद आणि उद्योग केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

Advertisement

प्रकल्पाशी संबंधित जमीन हस्तांतरण, निविदा प्रक्रिया, बांधकाम आणि इतर सर्व प्रशासकीय कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून २०२९ पर्यंत कन्व्हेन्शन सेंटर सुरू करण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.