Published On : Thu, Jul 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यात शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

Advertisement

मुंबई– महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील सर्व शासकीय, अनुदानित, खासगी, सीबीएसई, आयसीएसई आणि इतर सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये तसेच शाळेच्या आवारापासून ५० मीटर परिसरात जंक फूडची विक्री, मोफत वाटप आणि जाहिरातींवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले आहेत.

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या या निर्णयाचा राज्यातील सुमारे १.०८ लाख शाळा आणि २ कोटी विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोणत्या पदार्थांवर बंदी?
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शाळा परिसरात खालील पदार्थांची विक्री किंवा प्रचार करता येणार नाही:

वडापाव

Advertisement

समोसा

तळलेले पदार्थ

वेफर्स

बर्गर आणि इतर जंक फूड

कोल्ड ड्रिंक्स

जास्त साखर असलेली पेये

आईस्क्रीम

जास्त मीठ, साखर किंवा ट्रान्स फॅट असलेले खाद्यपदार्थ

सर्व शाळांना आदेश लागू-
FDA ने स्पष्ट केले आहे की हा आदेश राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांना लागू असेल. शाळांमधील कॅन्टीन, वसतिगृहातील भोजन व्यवस्था, अंगणवाडी केंद्रे तसेच अन्नपुरवठा करणाऱ्या संस्थांकडे वैध FSSAI परवाना आणि नोंदणी असणे बंधनकारक असेल.

अंमलबजावणीची जबाबदारी-
या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याची प्राथमिक जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनावर असेल. सरकारी आणि अनुदानित शाळांसाठी शालेय शिक्षण विभाग नोडल एजन्सी म्हणून काम करेल, तर इतर शिक्षण मंडळे आणि स्थानिक स्वराज्य संस्था देखरेख करतील.

नियमभंग केल्यास कारवाई-
अन्न व औषध प्रशासन लवकरच राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा किंवा संबंधित संस्थांविरुद्ध अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार नोटीस, परवाना निलंबन किंवा रद्द करणे तसेच आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे FDA ने स्पष्ट केले आहे.

या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, पौष्टिक आणि आरोग्यदायी आहार उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विश्वास FDA प्रशासनाने व्यक्त केला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.