Advertisement
नागपूर : डिसेंबर महिन्यात थंडीने आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्ह्याच्या किमान तापमानात मोठी घसरण दिसून आली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदले गेले. या मोसमातील हा सर्वात थंड दिवस आहे. गेल्या 24 तासांत तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट झाली.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. मध्यंतरी थंडी गायब झाली होती.
मात्र, प्रभाव संपताच तापमानात घसरण सुरू झाली. सध्या शहरात कडाक्याची थंडी असल्याने लोकांना दिवसाही उबदार कपडे घालावे लागत आहेत.