Published On : Thu, Oct 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात ९०० कोटींच्या सिमेंट रस्त्यांच्या कामांना ब्रेक; पाणीटंचाईमुळे महापालिकेचा मोठा निर्णय

: पाचव्या टप्प्यातील रस्ते कामे स्थगित; रस्त्यांचे काँक्रीटीकरण पुढे ढकलले
Advertisement

NMC seeks Rs 748 crore from State to make up for entertainment tax loss

नागपूर : नागपूर जिल्ह्यात यंदा अपुरा पाऊस झाल्याने पाणीटंचाईचे संकट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत करण्यासाठी नागपूर महापालिकेने सुमारे ९०० कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांना तात्पुरता ब्रेक लावण्याचा निर्णय घेतला आहे. पाचव्या टप्प्यातील रस्त्यांची कामे स्थगित करण्यात आल्याने शहरातील नियोजित काँक्रीटीकरणाची कामे पुढे ढकलण्यात आली आहेत.

महापालिकेने सुरुवातीला १३५ रस्त्यांची निवड केली होती. त्यानंतर आमदार आणि नगरसेवकांच्या प्रस्तावांमुळे ही संख्या २६५ पर्यंत पोहोचली. या टप्प्यात एकूण ९००.२२ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे नियोजन होते. मात्र, या कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने सध्याच्या परिस्थितीत कामे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या १८ वर्षांतील सर्वात कमी पाऊस यंदा नागपूर जिल्ह्यात नोंदवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच, धरणांमधील जलसाठा सुमारे ५८ टक्क्यांवर असल्याने पाणी वापराबाबत प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी दंडात्मक कारवाईचाही इशारा देण्यात आला आहे.

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देणे आणि उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करणे, या उद्देशाने महापालिकेने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शहरातील रस्ते विकासाच्या कामांपेक्षा सध्या पाणी बचतीला प्राधान्य देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.