Published On : Mon, May 25th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील कार डेकोरेशन दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

नागपूर : सक्करदरा परिसरातील एका कार डेकोरेशन दुकानाला सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत दुकानातील संगणक, कार डेकोरेशनचे साहित्य आणि इतर महागडे साहित्य जळून खाक झाले असून अंदाजे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजून ४२ मिनिटांच्या सुमारास अग्निशमन विभागाला आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सक्करदरा अग्निशमन केंद्राचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Gold Rate
May 22- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 160,100 /-
Gold 22 KT ₹ 1,48,900 /-
Silver/Kg ₹ 2,71,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ही आग कार डेकोरेशनच्या दुकानात लागली होती. दुकानाचे मालक शेख इकबाल मदीन असल्याची माहिती समोर आली आहे. आगीत दुकानातील संपूर्ण कार डेकोरेशन साहित्य, संगणक आणि इतर साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

अग्निशमन विभागाच्या प्राथमिक तपासात डी.पी. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सक्करदरा पोलिस ठाण्याचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग शेजारील भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे परिसरातील इतर दुकाने आणि मालमत्तेचे मोठे नुकसान टळले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement