
सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्थानकासमोरील तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. यावेळी मोहम्मद तनवीर मोहम्मद शाकिर (२६), खुमनचंद लखनलाल शाहू (२६) आणि शेख जावेद शेख वहीद (३८) यांना प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगताना पकडण्यात आले. तिघांकडून सुमारे ३३ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा ताजबाग येथील बाबा ताज पॅलेस येथे छापा टाकण्यात आला. या कारवाईत मोहम्मद मालाधारी (५४) याला प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी बाळगताना पकडण्यात आले. त्याच्याकडून सुमारे ३७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
आर्थिक फायद्यासाठी शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री केल्याप्रकरणी चारही आरोपींविरुद्ध सीताबर्डी आणि सक्करदरा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.




