Published On : Tue, Sep 10th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ऑडी कार अपघात प्रकरण;अखेर संकेत बावनकुळेच्या वाहनाची आरटीओकडून तपासणी

नागपूर:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ऑडी कारने एका दुचाकी वाहनासह पाच गाड्यांना धडक दिली. याप्रकरणी पोलिसांनी बावनकुळे यांच्या मुलासह दोघांना ताब्यात घेऊन विचारपूस करून सोडले. यातील अर्जुन जितेंद्र हावरे (वय 24) हा गाडी चालवत होता तर संकेत बावनकुळे हा बाजूच्या सीटवर बसून होता तर त्यांचा मित्र रोनित चिंतमवार (वय 27) हा मागच्या सीटवर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागपूर आरटीओकडून ऑडी कारची तपासणी –

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी बावनकुळे यांच्या चारचाकी वाहनाची तपासणी केल्याची माहिती समोर येत आहे.सर्वप्रथम निरीक्षणानंतर आरटीओच्या अधिकऱ्यांनी सीताबर्डी पोलिसांनी या अपघाताबाबत शासकीय यंत्रणेच्या इंटिग्रेटेड रोड एक्सिडेंट डेटा (आय रेड) या संकेतस्थळावर टाकले की नाही याबाबत तपासणी केली.

परंतु, त्यावर त्यांना माहिती आढळली नाही. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला या अपघात करणाऱ्या चारचाकी वाहनाच्या निरीक्षणाचा सूक्ष्म निरीक्षण अहवाल त्यावर टाकता आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पोलिसांनी अहवाल टाकला का पाहिले.मात्र आरटीओ अधिकाऱ्यांना त्यावर काहीच माहिती मिळाली नाही.

पोलिसांकडून तपासात विलंब
नागपुरात नियमानुसार जर एखादा अपघात झाला तर शहर पोलीस विभागाकडून शासनाच्या आय रेड या संकेतस्थळावर तातडीने अपघाताच्या माहितीसह संबंधित वाहनाचा क्रमांवर व त्यावरील प्राथमिक माहिती अपलोड केली जाते. त्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांकडूनही अपघाताचे निरीक्षण करून या अपघाताचे कारण व इतर अंदाज वर्तवले जातात.मात्र संकेत बावनकुळेच्या ऑडी कारने रविवारी अपघात झाला तरी आतापर्यंत सीताबर्डी पोलिसांनी वाहन संबधित अहवाल जाहीर केला नसल्याचे तपासाला विलंब का ? असा प्रश्न उपस्थीत करण्यात येत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement