Published On : Mon, Dec 16th, 2019

प्रवीण दरेकर यांची महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्षनेते पदी निवड

Advertisement

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपा पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरीही बहुमताचा आकडा पारकरू न शकल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि एनसीपी या महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलं आहे. त्यानंतर भाजपासाठी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपद महत्त्वाचे आहे.

दरम्यान या पदासाठी सुरजितसिंह ठाकूर,पंकजा मुंडे, सुरेश धस अशी नावं आघाडीवर होती. एनसीपी नेते धनंजय मुंडे यापूर्वी विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी होते.

प्रवीण दरेकर यांची राजकीय सुरूवात शिवसेनेपासून झाली. दरम्यान त्यांनी मनसे पक्षातून विधानसभा लढवली होती. ते राज ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जात होते. मात्र नंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकत भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला. आता त्यांची वर्णी विधानपरिषदेमध्ये विरोधी पक्ष नेते पदी लागली आहे.

यंदा महाराष्ट्र सरकारचे हिवाळी अधिवेशन 16-21 डिसेंबर दरम्यान होणार आहे.