
File Pic
नागपूर : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, आज पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवसेनेच्या आक्रमक झालेल्या आमदारांचा सामना करावा लागला.
विकासकामांसाठी निधी मिळत नसल्यानं संतप्त झालेले शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाले. यावेळी ह्या आमदारांनी विकासकामांना निधी देण्याची मागणी केली. दहा कोटी रुपयांचा निधी देण्याची कबुली दिलेली असतानाही तो निधी मिळत नसल्यानं शिवसेना आमदार संतप्त झाले आहे.
वर्षभर पाठपुरावा करुनही विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. विकासकामांसाठी निधी न मिळाल्यास विधीमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार नाही, असा इशारादेखील या आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
Advertisement









