नागपूर :विदर्भातील जनतेची थंडीची प्रतीक्षा आता संपत आहे. सकाळी आणि रात्री थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झालाच भास होत असून येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घसरण होऊ शकते. हे पाहता नागपूर आणि आसपासच्या जिल्ह्यांना आर्द्रतेपासून दिलासा मिळेल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
विदर्भातील इतर जिल्ह्यांप्रमाणे नागपुरातही उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव दिसून येत आहे. हे वारे थंड असल्याने तापमानात घट होते.
रविवारी नागपुरात कमाल तापमान 29.5 अंश तर सोमवारी सकाळी किमान तापमान 23.9 अंश होते. गेल्या २४ तासांत कमाल तापमानात ४.६ अंशांची घट झाली आहे.
येत्या काही दिवसांत तापमानात आणखी ३ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.यावेळी नागपुरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, मात्र आर्द्रता कमी होऊ शकली नाही. मान्सूनने माघार घेतल्यानंतरही अधूनमधून पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे नागपूरचे वातावरण थंड झाले आहे.