Published On : Mon, Jul 16th, 2018

Nagpur: दुधाचे ५ रुपये अनुदान दुध शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा करा –आमदार जयंत पाटील

MLA Jayant Patil

नागपूर : कर्जमाफीच्यावेळी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करणार होतात तसे ५ रुपयाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. दुधाची निर्यात होते की नाही हे पाहू नका. सरकारने कोतेपणा बाजुला ठेवून दुधाला ५ रुपये अनुदान दयावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावावर बोलताना केली.

यावेळी ते म्हणाले की, राज्यात दुधाच्या दराबाबत आंदोलने सुरु झाली असून आज विधानसभेत दुधाच्या दराचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. या राज्यातील खाजगी लोकांना सरकार प्रोत्साहन देत आहे. त्यांना जगवण्याऐवजी शेतकऱ्यांना जगवा अशी जोरदार मागणीही पाटील यांनी सभागृहात केली.

दुध दराबाबत आणि शेतकऱ्यांचे राज्यभर सुरु असलेल्या आंदोलनाच मुद्दा आज विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांनी आणि विरोधी सदस्यांनी उचलून धरला.