नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्यातअंतर्गत फसवणुकीची मोठी समोर आली आहे. नौकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 1,83,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणातील आरोपी रजत गुप्ता याला पोलिसांनी अटक केली.
माहितीनुसार, मानकापूर येथील रहिवासी नीलकचंद दुकारीलाल तांडेकर यांनी मुलाला नौकरी लावून देण्यासाठी रजत गुप्ता नावाच्या व्यक्तीला 1,83,000 दिले. आरोपी रजत गुप्ता याने स्वत:ची ओळख कोराडी पॉवर हाऊसमध्ये सुरक्षा रक्षक अधिकारी असल्याची करून दुकारीलालयाला विश्वासात घेतले.त्यानंतर, आरोपींनी 18 फेब्रुवारी 2024 ते 23 ऑक्टोबर 2024 दरम्यान दुकारीलालकडून 1,67,900 रुपये ऑनलाइन आणि 15,100 रुपये रोख घेतले.
मात्र दुकारीलालने मुलाच्या नोकरीबाबत गुप्ताला विचारणा केली असता आरोपीने त्याला खोटे नियुक्तीपत्र दिले. दुकारीलालने आरोपीकडे पैसे परत मागितले असता आरोपीने त्याला धमकावले. त्यानंतर पीडितेने मानकापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध फसवणूक व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.