
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाबाबू नंदलाल गिरी (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो मूळचा बिहार येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, ९ वर्षीय विद्यार्थिनी ऑटोरिक्षाने शाळेत जात होती. यावेळी गो गॅस एलपीजी पंपाजवळ आरोपीने तिच्या पायाला चिमटा काढल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर विद्यार्थिनीने आपल्या आईला फोन करून घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पालकांनी सक्करदरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
दरम्यान, या घटनेच्या तपासात एका ऑटोरिक्षाचालकानेही आरोपीला विद्यार्थिनीच्या पायाला चिमटा काढताना पाहिल्याचे पोलिसांना सांगितले. विद्यार्थिनीची तक्रार आणि प्रत्यक्षदर्शीचे जबाब याआधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सक्करदरा पोलीस करीत आहेत.



