Published On : Mon, Aug 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात खिडकीतून बाहेर फेकले भ्रूण; २२ वर्षीय युवतीविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisement

खिड़की से बाहर फेंका भ्रूण, युवती पर मामला दर्ज

नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन महिन्यांच्या गर्भवती २२ वर्षीय अविवाहित युवतीचा गर्भपात झाल्यानंतर तिने घाबरून भ्रूण बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना रविवारी समोर आली. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी भ्रूणाची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याप्रकरणी युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अचानक पोटात तीव्र वेदना-
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, युवती सकाळी आईसोबत फिरायला गेली होती. घरी परतल्यानंतर काही वेळातच तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना वाढल्याने ती बाथरूममध्ये गेली. त्याचदरम्यान तिचा गर्भपात झाला. या घटनेनंतर युवती घाबरून गेली.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कुटुंबीयांपासून लपवली होती गर्भावस्था-
युवती एका युवकाच्या संपर्कात असून ती सुमारे तीन महिन्यांची गर्भवती होती. मात्र, तिने ही बाब कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. गर्भपात झाल्यानंतर ही बाब घरच्यांना समजेल या भीतीने ती मानसिकदृष्ट्या घाबरली. त्यातूनच तिने बाथरूमच्या खिडकीतून भ्रूण बाहेर फेकल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू-
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित माहिती गोळा केली. त्यानंतर युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

दरम्यान, युवतीच्या गर्भावस्थेची परिस्थिती, संबंधित युवकाची भूमिका आणि गर्भपात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. वैद्यकीय तपासणी आणि अहवालाच्या आधारे गर्भपात नैसर्गिकरित्या झाला की त्यामागे अन्य कारण होते, हे स्पष्ट होणार आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.