Published On : Mon, Aug 24th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात एमडी तस्करीविरोधात आणखी एक कारवाई; ५३ ग्रॅम एमडी जप्त

दोन आरोपी ताब्यात; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, फरार आरोपीचा शोध सुरू
Advertisement

नागपुरात एमडी तस्करीविरोधात आणखी एक कारवाई; ५३ ग्रॅम एमडी जप्त

नागपूर : शहरात अमली पदार्थ तस्करीविरोधात पोलिसांची कारवाई सुरू असतानाच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई केली. या कारवाईत ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून, पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी फरार झाला आहे.

अमली पदार्थविरोधी पथकाला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पहाटे सदर छावणी परिसरातील बंगला क्रमांक ७/१२ च्या बंद गेटसमोरील सेवा मार्गावर सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान पोलिसांनी संदेश मून आणि शारीक खोकर यांना ताब्यात घेत त्यांच्या जवळून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ५ लाख ३० हजार रुपये आहे.

Gold Rate
Sept 07 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,000 /-
Gold 22 KT ₹ 1,41,900 /-
Silver/Kg ₹ 2,33,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी आरोपींकडून तीन मोबाईल फोन तसेच सुमारे ९ लाख रुपये किमतीची कारही जप्त केली. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १७ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान संदेश मून याच्याविरुद्ध सक्करदरा आणि प्रतापनगर पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दरम्यान, या प्रकरणातील तिसरा आरोपी वारिस अन्सारी हा फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अमली पदार्थाच्या या प्रकरणामागील संपूर्ण साखळीचा तपास पोलीस करत आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.