Published On : Tue, Sep 15th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा १७ वर्षीय मुलगा ठरला ‘वर्ल्ड स्ट्राँग मॅन’!

किर्गिझस्तानमध्ये चैतन्य राऊतची दमदार कामगिरी
Advertisement

नागपूरच्या पोलीस कर्मचाऱ्याचा १७ वर्षीय मुलगा ठरला ‘वर्ल्ड स्ट्राँग मॅन’!नागपूर : नागपूर शहर पोलीस दलाचा मान आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा उंचावला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी शेषराव राऊत यांचा १७ वर्षीय मुलगा चैतन्य राऊत याने किर्गिझस्तानमध्ये आयोजित १३व्या वर्ल्ड स्ट्रेंथ लिफ्टिंग स्पर्धेत शानदार कामगिरी करत दोन सुवर्णपदकांवर नाव कोरले. सब-ज्युनिअर गटात दमदार प्रदर्शन करत चैतन्यने ‘वर्ल्ड स्ट्राँग मॅन’चा किताब पटकावला.

स्पर्धेदरम्यान चैतन्यने आपल्या ताकदीसह उत्कृष्ट तंत्राचेही प्रदर्शन केले. विशेषतः बायसेप्स कर्ल प्रकारात त्याने विश्वविक्रमाच्या कामगिरीची बरोबरी करत आपली क्षमता सिद्ध केली. या कामगिरीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल झाले आहे.

चैतन्य हा पिपळा रोड, हुडकेश्वर येथील सेंट पॉल कॉलेजमध्ये बारावीमध्ये शिक्षण घेत असून त्यासोबतच जेईई परीक्षेची तयारीही करत आहे. शिक्षण आणि स्ट्रेंथ लिफ्टिंगचा सराव यांचा समतोल साधत त्याने मिळवलेले हे यश त्याच्या मेहनत, शिस्त आणि जिद्दीचे प्रतीक मानले जात आहे.

Gold Rate
Sept 12,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 53,400 /-
Gold 22 KT ₹ 1,42,300 /-
Silver/Kg ₹ 2,31,200/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चैतन्यच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे नागपूरच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. त्याच्या यशाबद्दल पोलीस अधिकारी, सहकारी आणि क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.