Published On : Fri, Jan 24th, 2020

नगर परिषदेत मालमत्ता करात २१ लक्ष ३८ हजारांची अफरातफर

Advertisement

चार कर्मचाऱ्यावर काटोल पोलिसात गुन्हा दाखल

काटोल : काटोल नगर परिषदेमध्ये मालमत्ता कराता २१ लक्ष ३८ अफरातफर असल्या प्रकरणी मंगळवार रात्री पालिकेचे उप मुख्याधिकारी विजय लखपती आत्राम यांनी काटोल पोलिसात तक्रार दाखल केली तक्रारीनुसार नगर परिषदेचे कर्मचारी लीलाधर चरडे, विनोद बाबावर बारस्कर, रुपेश सावरकर, केशव जवंजाळ यांचे भा.द.वी. ४०९,४०८,४२०,४६८,४७१,४०३ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी नागेश जाधव,पो.नि.महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप.निरीक्षक राहुल बोंद्रे करीत आहे.

Gold Rate
3 May 2025
Gold 24 KT 93,800/-
Gold 22 KT 87,200/-
Silver/Kg 94,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मिळालेल्या माहितीनुसार १० जानेवारी २०१९ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान काटोलकर नागरिकांच्या वतीने पालिकेत मालमत्ता कराची २१ लक्ष ३८ हजार ८८७ रुपये जमा करण्यात आली तश्या पावत्या सुद्धा नागरिकांना देण्यात आल्या व हे सर्व पैसे बँकेत जमा करण्यात आल्याच्या पावत्या पालिका कार्यालयात सुधा संबंधित कर्मचार्याच्या वतीने जमा करण्यात आल्या परंतु पावत्यांचे पैसे बँकेतील पालिका अकाऊंट मध्ये जमाच करण्यात आले नसल्याची बाब बँक ऑडिट मध्ये उघड झाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पालिकेचे मुख्याधिकारी अशोक गराटे यांनी पालिका स्तरावर चौकशी केली त्यात जमा करण्यात आलेल्या पावत्यावर बोगस स्टंप असल्याचे निष्पन झाले त्यानुसार अहवाल सादर करीत संबंधित विभाच्या चार कर्मचाऱ्यांवर पालिकेच्या वतीने काटोल पोलिसात मंगळवार रात्री तक्रार दाखल करण्यात आली पुढील तपास काटोल पोलीस करीत आहे.

सत्ता पक्ष गट नेते चरणसिंग ठाकूर : हे प्रकरण प्रशासकीय विभागाशी संबधित असून मुख्याधिकारी यांनी याबबत लक्ष घालणे गरजेचे होते त्यांनी सर्व प्रकरण योग्य रित्या हाताळावे सोबत ज्या कोणी कर्मचार्यांनी हे कृत्य केले असेल त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा व्हावी.ज्या पालिकेचे नाव सर्व देश्यात आहे तेथे असे प्रकरण उघडकीस येणे वेदना देणारे आहे.

नगर परिषद काटोल मुख्याधिकारी अशोक गराटे: प्रकरण उघकीस येताच माझ्या स्तरावर सर्व चौकशी करून तसा अहवाल तयार करून काटोल पोलिसात संशयितांविरोधार तक्रार दाखल करण्यात आली आहे पुढील चौकशी सुरु आहे.

Advertisement
Advertisement