Published On : Wed, Jan 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

माझा देव चोरला; अजित पवारांच्या निधनानंतर सूरज चव्हाण भावूक

Advertisement

बारामती – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर बिग बॉस मराठी सिझन ५ चे विजेता सूरज चव्हाण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

सूरजने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक भावपूर्ण पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्याने अजित दादांना नमस्कार करत त्यांच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे. त्याने लिहिले आहे, “माझा देव चोरला! मला अजिबात विश्वास बसेल असं नाही की आपले लाडके कार्यसम्राट अजित दादा आता आपल्यात नाहीत. माझ्यासारख्या गरीब मुलाला त्यांनी सोन्यासारखा घर दिलं, माझी काळजी घेतली आणि मला नवीन आयुष्य दिलं. अजित दादांसारखा देव माणूस या जगात कुणी नाही. माझ्या आई-आप्पानंतर अजित दादांनी माझ्यासाठी जे काही केलं, त्याची मी आयुष्यभर कदर करीन.”

अजित पवार हे मुंबईहून बारामतीला जाणाऱ्या विमानात होते. विमान बारामती विमानतळाजवळील शेतात कोसळलं आणि त्यानंतर जोरदार स्फोट झाला. या अपघातात अजित पवारांसह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाला. भीषण अपघाताचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या दुर्दैवी घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे. अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाबदार आणि जनप्रिय नेतृत्व होते, ज्यांचे निधन महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.