Published On : Wed, Oct 14th, 2020

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत 11 लाख 89 हजार नागरिकांचे सर्व्हेक्षण

Advertisement

सर्वेक्षणाचे काम 97 टक्के पूर्ण

· सर्वेक्षणात आढळले 172 पॉझिटीव्ह

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

भंडारा : प्रभावी कोविड-19 नियंत्रणासाठी नविन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरीत करण्यासाठी जिल्हयात “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिम प्रभावीपणे राबविली जात असून 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोंबर 2020 या पहिल्या टप्यात 11 लाख 89 हजार 269 नागरिकांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. यात एकूण 172 व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे.

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर पथकांनी जिल्हयातील 2 लाख 86 हजार 179 कुटुंबांना भेटी देऊन तपासणी केली. जिल्हयाची एकुण लोकसंख्या 12 लाख 21 हजार 616 असून आतापर्यंत 11 लाख 89 हजार 269 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीची टक्केवारी 97 टक्के एवढी आहे.

या तपासणी मोहिमेत जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह 172 रूग्ण आढळून आले. सारी व आयएलआयच्या 1172 केसेस तर कोमॉरबिड (सहव्याधी) रूग्णांची संख्या 84 हजार 796 एवढी आढळून आली. आता मोहिमेचा दुसरा टप्पा 14 ऑक्टोंबर पासून सुरू झाला असून तो 24 ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे. पथकांचे गृहभेटीचे नियोजन पूर्ण झाले आहे.

तालुका निहाय सर्व्हे करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या खालील प्रमाणे
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आशा कार्याकर्तीव्दारे सर्व्हेक्षणामध्ये घरांना भेटी देतांना लोकांशी संवाद साधुन सदर मोहीमेची सेल्फी काढण्यात येऊन मोहिमे संबंधी व कोविड-19 संबंधी माहिती कळविण्यात येते. तसेच कोरोनाबाबत जागृती करण्यात येते.

लोकप्रतिनिधी, खाजगी रूग्णालय व आशा स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम कोविड-19 साठी नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून जिल्हयात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यक्त केला.

गृह भेटीचे नियोजन पूर्ण -भूवनेश्वरी एस.
माझे कुटुंब माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पुर्ण झाले असून 14 ते 24 ऑक्टोंबर या कालावधीसाठी पथकांच्या गृह भेटीचे नियोजन पुर्ण झाले आहे. मोहिमेचे लक्ष साध्य करणे तसेच मोहिम प्रभाविपणे राबविणे या साठी प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पथकाच्या पर्यवेक्षणाचे नियोजन पुर्ण झाले आहे. दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.

Advertisement
Advertisement