Published On : Tue, May 24th, 2022

माया केअर तर्फे ज्येष्ठ नागरिकांना मोफत मदत सुविधा.

Advertisement

गेल्या 13 वर्षापासून माया केअर तर्फे सर्व गरजू वृद्ध व्यक्तींना त्यांच्या भावनिक- बौद्धिक ने-आण करणे अशा गरजांची पूर्तता करण्यासाठी विनामूल्य सुविधा देते ज्यामुळे ते आनंदी आणि आत्मनिर्भर जीवन जगू शकतात..

यामध्ये ज्येष्ठांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे, बँकेच्या कामात मदत करणे , शासकीय कामात मदत करणे , दुकानातून औषधे आणून देणे , त्यांच्यासोबत बागेत फेरफटका मारणे , व्हिडिओ कॉल करण्यासाठी मदत करणे , त्यांच्यासाठी लिहिणे – वाचणे ,मनोरंजनात्मक खेळ खेळणे, तसेच त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे यासह अनेक प्रकारची मदत पूर्णपणे मोफत केली जाते.

Advertisement

सध्या ही संस्था भारताच्या 39 शहरांमध्ये व UK तील 4 शहरांमध्ये काम करते. या संस्थेचे मागील कामकाज 100 पेक्षा जास्त अपंग लोक आपल्या घरी बसून करत आहेत. यामुळे त्यांना रोजगारही उपलब्ध होत आहे व तेही आत्मनिर्भर बनत आहेत.या संस्थेच्या मार्फत आत्तापर्यंत ज्येष्ठांना 11000 पेक्षा जास्त वेळा भेटी दिल्या आहेत.

वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या घरात व वृद्धाश्रमात ,सहाय्यक आयुष्यात स्वतंत्र , आनंदी आणि सोयीस्कर जीवन जगण्यासाठी सक्षम बनवणे आणि अपंग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्याकडून स्वतःच्या घरातून काम करून घेऊन स्वावलंबी व्यवसायिक बनवण्याचे उद्दिष्ट आहे .

तसेच जगातील प्रत्येक शहरातील ज्येष्ठांना ही सुविधा मोफत मिळावी व तेथील अपंग व्यक्तींना रोजगार उपलब्ध व्हावा या दिशेने संस्थेचे कामकाज सुरू आहे.

आपणासही अशा प्रकारची मदत हवी असल्यास 9552510400 /9552510411 या हेल्पलाइनवर संपर्क साधा अथवा www.mayacare.org या संकेत स्थळाला भेट द्या.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement