Published On : Fri, Nov 20th, 2020

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स ची संगीतमय दिवाळी भेट. 

Advertisement

.नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स नागपूर ने सदाबहार नगमे ह्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्हॉईस ऑफ मुकेश नावाने सुपरिचित असलेले गायक डॉ संजय उत्तर वार हे प्रमुख पाहुणे व अतिथी गायक होते. कार्यक्रमाला नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यकारिणी चे सदस्य श्री अश्विन मेहाडिया अध्यक्ष,  श्री फारुक अकबनी उपाध्यक्ष, श्री. राम अवतार तोतला सचिव, अर्जुंदास आहुजा उपाध्यक्ष, ह्यांनी सुमधुर गीत सादर केले. अतिथी गायक डॉ उत्तर वार ह्यांनी सीचेंगे तुम्हे प्यार करे की नही…. हे सदाबहार गीत सादर करून वाहवा मिळवली.

कार्यक्रमाची सुरुवात सत्यम शिवम सुंदरम …ह्या गाण्यांनी झाली. हैं दुनिया उसिकी…., सारा जमाना हसिनो का दीवाना…., ओ मेहबूबा तेरे दिल के पास ही ….., यारी हैं इमान मेरा….., झूम झूम बाबा…., बोले रे पापिहारा….. असे एकाहून एक सुंदर गीत गायकांनी सादर केले. श्री व सौ शर्मा, श्री व सौ ललवाणी, उमेश पटले, आनंद मेहाडीया, साक्षी राऊत, प्रांजली मुंदडा ह्या गायकांनी सुमधुर गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचलन श्री राम अवतार तोतला ह्यांनी केले. अतिथी गायक डॉ उत्तर वार ह्यांनी नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स चे अभिनंदन केले व कोविड मध्ये त्यांनी केलेल्या समजप्रयोगी कार्याची प्रशंसा केली. डॉ उत्तर वार हे सुद्धा एक समाज सेवक आहेत व नेहमी समजुप्योगी उपक्रम ते राबवत असतात.

डॉ संजय उत्तरवार हे   इंजिनिअरिंग कॉलेज चे प्राचार्य आहेत. त्यांना आठ  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळी चे पुरस्कार मिळालेले आहेत.  त्यांना गेल्या ३० वर्षाचा अध्यापनाचा आणि प्रशासकीय अनुभव आहे. मध्य भारतातील ते एक नामांकित वक्ते आणि प्रशिक्षक आहेत. टी वी चॅनल, रेडिओ वर आणि विविध महाविद्यालयात  त्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान  नेहमी होत असते. 

त्यांचे ६१ शोध प्रबंध हे प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावे पेटंट सुद्धा आहेत. लॉक डाऊन च्या काळात आतापर्यंत त्यांनी विविध विषयावर पन्नास वेबिनर दिले आहेत. ह्या सोबतच ते नागपूर चे एक प्रसिद्ध गायक आहेत आणि व्हॉईस ऑफ मुकेश ह्या नावाने सर्वांना परिचित आहेत. त्यांचे स्वतः चे डॉ संजय उत्तरवार  ह्या नावाने  यू ट्यूब चॅनल असून त्यावर सर्व व्याख्यान आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. 

नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स सचिव श्री राम अवतार तोतला ह्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या व उपस्थितांचे आभार सुद्धा मानले