Published On : Tue, Sep 10th, 2019

खळबळजनक! नागपुर शहर मध्ये कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळखणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक लोखंडे सह 11 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल

नागपुर टुडे – नेवासा पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन ओळखणारे तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक भिंगारे, जांभळे व इतर कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत संशयित आरोपीचा मृत्यू झाल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात उच्च न्यायालयाच्या आदेशावरून 11 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement
Advertisement

सुमारे दोन-अडीच वर्षापूर्वी नेवासा पोलीस ठाण्यात एका संशयिताचा मृत्यू झाला होता. फाशी घेऊन आरोपीचा मृत्यू झाला, असा पोलिसांनी बचाव केला होता. दुसरीकडे मयताच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा दावा केला होता. या मृत्यू प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत ( सीआईडी ) चौकशी करण्यात आली होती. मात्र त्यात पोलिसांना ‘क्लिनचिट’ मिळाली होती.

Advertisement

याप्रकरणी मयतांच्या नातेवाईकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने तत्कालीन पोलिस निरीक्षक लोखंडे व इतर अधिकारी व 11 पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. या आदेशाविरुद्ध लोखंडे व इतर पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती, . याविरोधात अपिलाचा ही प्रस्ताव नाकारल्याने नेवासा पोलीस ठाण्यात मयताच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून तत्कालीन पोलीस निरीक्षक लोखंडे व इतरांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचारी अशा सुमारे अकरा जणांचा समावेश होता। पुढील तपास शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे करत आहेत.

Advertisement

अमोलवर दाखल होते विविध गुन्हे

अमोल पिंपळेवर नेवासा, शेवगाव तसेच नाशिक जिल्ह्यातील नांदगाव व पिंपळगाव येथे चोरी, घरफोड्या व दरोड्याचे गुन्हे दाखल होते. नेवासा पोलीस ठाण्याअंतर्गत 2017 मधील 273 क्रमांकाच्या गुन्ह्यात (कलम 457 व 380) त्याला 18 ऑगस्ट रोजी नेवासा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. त्याआधी 5 ऑगस्ट 2016 रोजी आर्म अ‍ॅक्ट 3/25 नुसार 5 जुलै 2016 रोजी त्याला अटक केली होती. शेवगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान 396 अंतर्गत त्याला 23 जुलै 2017 रोजी व त्यानंतर नांदगाव (नाशिक) पोलीस ठाण्याअंतर्गत कलम 395 अंतर्गत 27 जुलै 2017 रोजी अटक केली होती.

पिंपळगाव (नाशिक येथील कलम 395 व 397 अंतर्गत त्याला 2 ऑगस्टला अटक करण्यात आली होती. नेवासा पोलीस ठाण्यांतर्गत 457 व 380 कलमान्वये दाखल 9 गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. त्यापैकी 8 गुन्हे 2017 मधील तर एक गुन्हा भारतीय दंड विधान कलम 394 व आर्म अ‍ॅक्ट 4/25 अंतर्गत गुन्हा दाखल होता. या सर्व प्रकरणांत तो फरार होता।

पोलिस अधीक्षक अहमदनगर ईशु सिंधु यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली की माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाने खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे , पुढील तपास शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे करत आहेत.

-रविकांत कांबळे
नागपुर टुडे

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement