Published On : Thu, Jul 6th, 2023

नागपूरच्या यशोधरा नगर बुद्ध विहारजवळ एकाची हत्या !

संशयित आरोपी फरार, पोलिसांकडून तपास सुरु
Advertisement

नागपूर : नागपूरच्या यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वदीप बुद्ध विहाराजवळ गुरुवारी पहाटे एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना घडली आहे.
भरत उके असे मृतकाचे नाव असून, संशयित आरोपी बंटी गटकरे हा फरार आहे. या हत्येमागील कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांकडून घटनेची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट असून पोलिसांनी घटनेचा छडा लावण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी घखटल्यासाठी महत्त्वपूर्ण पुरावे गोळा करण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. मृत्यूचे कारण शोधण्यासाठी आणि फॉरेन्सिक पुरावे गोळा करण्यासाठी, भरत उके यांचा मृतदेह पोस्टमॉर्टम तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.