Published On : Fri, Jun 9th, 2023

नागपूर रेल्वे स्थानकावर हत्या ; आरोपीला अटक

Advertisement

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर सिमेंटच्या दगडाने डोक्यात वार करून तरुणाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी जीआरपीएफ पोलिसांनी आरोपीला अटक केली. जितेंद्र ऊर्फ टोपी (रा. छत्तीसग) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर दीनदयाल उर्फ दिनेश धोडिबा सदाफुले असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो पुण्यातील रहिवासी आहे.

माहितीनुसार, आज सकाळी (ता. ९) सकाळी 2.40 ते 3.00 दरम्यान न प्लॅटफॉर्म पेट्रोलिंग करीत असलेले पोलीस कर्मचाऱ्यांना प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर एक इसम जखमी अवस्थेत आढळून आला. या घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मृतकास एक इसम मारत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला.

Advertisement

त्यानंतर तडकाफडकी पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी हा इटारसी एंड कडे दडून बसलेला मिळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर आपसी वादातून आपण जितेंद्र ऊर्फ टोपी यांची हत्या केल्याची कबुली आरोपी सदाफुले यांनी दिली. आरोपीने जितेंद्र यांच्या डोक्यात सिमेंटचा मोठा दगड घातल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.