Published On : Thu, Apr 1st, 2021

मनपा पदाधिकारी, नगरसेवकांनी केली कोरोना प्रादुर्भावाबद्दल जनजागृती

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या पदाधिका-यांनी व ज्येष्ठ नगरसेवकांनी बुधवारी शहराचे विविध बाजारपेठेत जाऊन कोरोनाच्या वाढता प्रार्दुभावाबद्दल नागरिक व दूकानदारांमध्ये जनजागृती केली.

महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी मंगळवारी मनपाचे पदाधिका-यांना व ज्येष्ठ नगरसेवकांना बाजारपेठेत जाऊन नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले होते. महापौरांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देवून सत्तापक्ष नेते श्री. अविनाश ठाकरे, माजी क्रीडा समिती सभापती श्री. प्रमोद चिखले, धंतोली झोनच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती किरण बगडे व धंतोली झोन सभापती सुश्री वंदना भगत यांनी फुले मार्केट, माजी सत्तापक्ष नेता श्री. संदीप जाधव, नगरसेवक श्री.निशांत गांधी यांनी सदर बाजार परिसर, धरमपेठ झोनचे सभापती श्री. सुनिल हिरणवार व ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती वर्षा ठाकरे यांनी गोकुलपेठ मार्केट व सीताबर्डी मार्केट, मंगळवारी झोनच्या सभापती श्रीमती प्रमिला मथरानी, वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे माजी सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा यांनी जरिपटका बाजारपेठत तसेच ज्येष्ठ नगरसेवक डॉ.रविन्द्र भोयर, नगरसेविका श्रीमती उषाताई पॅलट व श्रीमती शीतल कामडे, हनुमाननगर झोनच्या सहाय्यक आयुक्त सुषमा मांडगे, विभागीय (स्वच्छता) अधिकारी श्री. कलोडे यांनी सक्करदरा बाजारात जावून नागरिकांना व दूकानदारांना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, वारंवार हात धुण्याचे आवाहन केले. त्यांचा सोबत उपद्रव शोध पथकाचे जवानसुध्दा होते. जवानांनी कोव्हिड नियमांचा भंग करणा-यांविरुध्द कारवाई केली. नागरिकांना लसीकरणाचा लाभ घेण्याची विनंतीसुध्दा पदाधिका-यांनी केली.

Advertisement

Advertisement

नागपूरात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. लसीकरण केल्याने कोरोनाचा मृत्यु दर कमी करण्यास मदत होईल आणि नागपूर कोरोनामुक्त शहराकडे वाटचाल करेल.

केन्द्र शासनाच्या दिशा निर्देशानुसार दिनांक १ एप्रिल पासून ४५ वर्षे व त्यावरील वयोगटाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण होणार आहे. पदाधिकारी व नगरसेवकांनी नागरिकांना याबद्दल माहिती दिली आणि लस घेण्याचे आवाहन केले.

Advertisement

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement