Published On : Thu, Apr 1st, 2021

मेडिकल, मेयो मधील बेडची संख्या तातडीने वाढवा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे निर्देश

Advertisement

दोन्ही हॉस्पिटलच्या डीन सोबत उच्चस्तरीय बैठक
मेडिकल कॉलेजमधील सर्व डॉक्टरांना वैद्यकीय सेवा अनिवार्य
ग्रामीण भागातील रूग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करा
ॲम्बुलन्समध्ये रुग्ण ताटकळत राहता कामा नये
रुग्णालयाच्या आस्थापना गैरवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे देण्याचे आदेश
आणीबाणीत सर्व डॉक्टरांना वैद्यकीय सेवेत रुजू होण्याचे आदेश
45 वर्षावरील सर्व बाह्य रूग्णांनाही कोविड लसीकरण करा

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात नागपूरमध्ये बाधितांच्या मृत्यूचा दर अधिक आहे. तसेच बाहेरून येणाऱ्या रुग्णाला तातडीने बेड उपलब्धता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे तातडीने बेडची संख्या वाढविण्यात यावी, सर्व डॉक्टरांच्या वैद्यकीय व अन्य कोणत्याही कारणास्तव घेतलेल्या सुट्ट्या रद्द करण्यात याव्यात. आलेल्या रुग्णाला ताटकळत न ठेवता तातडीने वैद्यकीय मदत दिली गेली पाहिजे, असे स्पष्ट निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज येथे दिले.

Gold Rate
02 july 2025
Gold 24 KT 97,500 /-
Gold 22 KT 90,700 /-
Silver/Kg 1,06,600/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज दुपारी सर्वपक्षीय कोविड आढावा बैठकीनंतर पालक मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अॅलेक्सिस हॉस्पिटल, इंदिरा गांधी वैद्यकीय शासकीय रुग्णालय (मेयो), वैद्यकीय शासकीय महाविद्यालय (मेडिकल) रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन अधिष्ठात्यासह रुग्णालय व्यवस्थापनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. तीनही हॉस्पिटलमधील प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर व सर्व संबंधित अस्थापना पदावरील अधिकारी, अधिष्ठाता उपस्थित होते.

“लोकप्रतिनिधी व सामान्य नागरिकांकडून या आणीबाणीच्या काळामध्ये वैद्यकीय व्यवस्थेबाबत येणाऱ्या तक्रारीमधील अनेक बाबी वैद्यकीय व्यवस्थेवरील ताण म्हणून समजून घेता येतील. मात्र येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला परिसरात आल्यानंतर तातडीने उपचार मिळाला पाहिजे. त्यासाठी कोणतेही कारण पुढे करू नये. आलेल्या रुग्णावर तातडीने उपचार सुरु करण्यासाठी बेडची संख्या वाढवा, वैद्यकीय कारणास्तव किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव सुट्टीवर गेलेल्या डॉक्टरांची सेवा तातडीने परत घ्या, वरिष्ठ डॉक्टरांना प्रत्यक्ष ईलाज करण्याच्या कामात समाविष्ट करून घ्या, प्रोफेसर व अन्य गैर वैद्यकीय कामात असलेल्या सर्व डॉक्टरांना वैद्यकीय कामे द्या, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांची मदत घ्या ” , असे स्पष्ट निर्देश त्यांनी आज दिले.

रुग्ण आल्यानंतर बेड उपलब्ध नसल्यामुळे उशिरा वैद्यकीय ईलाज सुरू झाला अशा काही तक्रारी आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्देशानंतर मेडिकल कॉलेजमध्ये बेसमेंटमध्ये देखील वैद्यकीय सुविधा पुरविण्याची सुरुवात झाली आहे. राज्य शासनाने वैद्यकीय वापरासाठी 80 टक्के ऑक्सिजन पुरवठा बंधनकारक केला आहे. आरोग्य विभागाने या संदर्भातील अधिसूचना काढली आहे. नागपूरमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करताना या सूचनेचे पालन होत आहे. त्यामुळे आता ऑक्सिजनची कमतरता नाही. असे असताना संपूर्ण महाराष्ट्रात मृत्युसंख्या नागपुरात अधिक असणे हे योग्य नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांनी दररोज 30 बेड अतिरिक्त तयार होत असून मेडिकल कॉलेजमधील बेडची संख्या वाढत असल्याचे सांगितले. कोणत्याही रुग्णाला ताटकळत ठेवले जाणार नाही, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मोठ्या संख्येने एकाच वेळी रुग्ण आल्यानंतर व्यवस्थापनात लागणाऱ्या वेळामुळे काहीवेळा रुग्णाला बेड मिळायला वेळ झाला असेल, मात्र यापुढे की समस्या असणार नाही असेही त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी मृत्यू संख्या नियंत्रणात आणण्यासाठी शासनामार्फत हवी ती मदत मिळेल. तसेच रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना वैद्यकीय सेवेचे काम देण्यात यावे. आस्थापना विषयक कार्यासाठी अन्य मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल, असे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनीही ऑक्सिजन, औषध व मनुष्यबळ या संदर्भातील सर्व समस्या सोडवल्या जातील. मात्र वैद्यकीय सेवेत कोणतीही कमतरता राहू नये असे आवाहन यावेळी केले.

मेयो व मेडिकल या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या आजारांच्या उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरणाची मोहीम राबवितांना आता 45 वर्षाच्या वरील सर्वांना लसीकरण करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे बाह्यरूग्ण सेवेत येणाऱ्या सर्व रुग्णांना लसीकरण करण्यात यावे. कोणत्याही राज्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, प्रत्येक रुग्णाचे लसीकरण करण्यात यावे, असे निर्देशही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.

Advertisement
Advertisement