Published On : Tue, Dec 20th, 2022
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या आरोग्य पुस्तिकेचे आयुक्तांच्या हस्ते विमोचन

Advertisement

स्वच्छता, आरोग्य व किटकजन्य आजारांच्या जनजागृती संदर्भात पुढाकार

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे प्रथमच प्रकाशित करण्यात आलेल्या आरोग्य पुस्तिकेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी नुकतेच विमोचन केले. याप्रसंगी उपायुक्त श्री. निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलाणी, श्री. राजेश ठाकरे, श्री. सुनिल दातार व श्री. योगेश नागे उपस्थित होते.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

प्रशासन आणि जनतेमध्ये प्रभावी संवाद साधुन त्यांच्यात असलेले अंतर कमी करून नागरिकांपर्यंत आवश्यक सेवा पोहचविण्याकरिता नागपूर महानगरपालिका सातत्याने प्रयत्न करीत आहे. सदर माहितीपुस्तीका असाच एक प्रयत्न आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनानुसार हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलाणी यांनी सदर पुस्तकाची संकल्पना करून लेखन व संपादन केले. सदर माहिती पुस्तिकेमध्ये सुदृढ आरोग्यासाठी आवश्यक माहिती, स्वच्छता, आजारी असतांना घ्यायची काळजी, आजारांबाबत नागरिकांमध्ये असलेल्या गैरसमजेचे निवारण, किटकजन्य आजार टाळण्यासाठी नागरिकांकरिता जनजागृती तसेच महानगरपालिकेने केलेल्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांबाबत माहिती देण्यात आली आहे.

‘नववर्षाचे नवचैतन्य, स्वच्छता आणि आरोग्यास देऊ प्राधान्य’ या घोषवाक्यासह नागपूर महानगरपालिकेची ही नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी नववर्षाची पुस्तकरूपी नवसंकल्पना असल्याचे हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. जस्मीन मुलाणी यांनी सांगितले.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.