Published On : Mon, Dec 6th, 2021

पर्यावरण संवर्धन व वातावरणीय बदल संदर्भात मनपाची जनजागृती

Advertisement

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका आणि रक्षण धरणी मातेचे फाउंडेशन, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमअंतर्गत शहरात विविध ठिकाणी पर्यावरण संवर्धन व वातावरणीय बदल याविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे.

या कार्यक्रम अंतर्गत सिंगल युज प्लास्टिकचे दुष्परिणाम, सिंगल युज प्लास्टिक पर्याय, कचरा विलगीकरण, वायू प्रदूषण, जल प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, वाहनाच्या धुरापासून होणारे प्रदूषण याबद्दल माहिती देऊन त्याची उपाययोजना कशी करावी या विषयी मार्गदर्शन करण्यात येत असुन माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत पर्यावरण संवर्धनाची #Epledge घेण्यात येत आहे. चंद्रपूर शहराच्या विविध भागात शाळा, कॉलेज, खाजगी शिकवणी वर्ग, प्रार्थनास्थळे इत्यादी भागात राष्ट्रीय शुद्ध हवा जनजागृती कार्यक्रम राबविला जात आहे.

राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रम अंतर्गत पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे जनजागृती व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. आतापर्यंत विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, एम.के.क्लासेस, बाल संस्कार शाळा, माता मंदिर, जटपुरा गेट, न्यूटन एकेडमी रामनगर, एम. के. क्लासेस, आकाशवाणी रोड, IBTE कंप्यूटर इंस्टिट्यूट जटपुरा गेट आधी ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले.