Published On : Thu, May 11th, 2023
By Nagpur Today Nagpur News

शहरातील खेळाडूंसाठी मनपाचे ‘ खेलो नागपुर प्रशिक्षण शिबीर’

- मनपातर्फे खेळाडूंसाठी मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबीर| - १५ मे ते १५ जून या कालावधीत तज्ज्ञ प्रशिक्षक करणार मार्गदर्शन
Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा विभागातर्फे शहरातील विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी सोमवार १५ मे ते १५ जून या दरम्यान ‘खेलो नागपुर प्रशिक्षण शिबीर’ या मोफत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध खेळांचे प्रशिक्षण प्राप्त करण्याची सुवर्ण संधी शहरातील खेळाडूंनी सोडू नये. तसेच शिबिराला भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी यांनी केले आहे.

सदर शिबिराबद्दल माहिती देत मनपाचे क्रीडा अधिकारी श्री. पियुष आंबुलकर यांनी सांगितले की, महिनाभर चालणाऱ्या क्रीडा प्रशिक्षण शिबिरात मान्यता प्राप्त प्रशिक्षक (कोच) व NIS सर्टीफाईड आणि राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू यांच्या मार्गदर्शनात शहरात विविध खेळाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच शिबिरादरम्यान सर्व सहभागी खेळाडूंची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, न्यूट्रिशियन संदर्भातील सल्ला सहभागी खेळांडूना दिल्या जाणार आहे. सदर क्रीडा प्रशिक्षण शिबीर सहाही विधानसभा मतदान क्षेत्रानुसार आयोजित करण्यात येणार असून, यात फूटबॉल, अॅथलेटिक्स फिटनेस, सॉफ्टबॉल, खो-खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कुश्ती, आदी क्रीडा प्रकारचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यात दक्षिण नागपुरातील ओमकार नगर NIT फुटबॉल मैदान येथे सकाळी 06:00 ते 09:00 वाजता दरम्यान कोच शेरयाल अली (D लायसन्स कोच फुटबॉल) यांच्या मार्गदर्शनात फूटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच महावीर नगर मैदान, नंदनवन येथे सकाळी 06:00 ते 09:00 वाजता दरम्यान कोच गौरव मिरासे (NIS कोच) यांच्या मार्गदर्शनात अॅथलेटिक्स फिटनेसचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर महालक्ष्मी नगर मैदान, न्यु नरसाळा रोड येथे सकाळी 06:30 ते 09:00 दरम्यान केतन ठाकरे (नॅशनल प्लेयर) यांच्या मार्गदर्शनात सॉफ्टबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पूर्व नागपुरात विश्व ज्योती मैदान, शांतीनगर येथे सकाळी 06:00 ते 09:00 वाजता दरम्यान कोच विकास मेश्राम (D लायसन्स कोच फुटबॉल) यांच्या मार्गदर्शनात फूटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर संजय नगर म.न.पा. शाळा, डिप्टी सिंग्नल येथे सायंकाळी 05:00 ते 07:00 दरम्यान कोच गजानन ठाकरे / गौरव मिरासे यांच्या मार्गदर्शनात अॅथलेटिक्स / सॉफ्टबॉलचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे.

पश्चिम नागपुरात तिरपुडे कॉलेज, सदर येथे सकाळी 06:00 ते 09:00 दरम्यान कोच शिखा कलाकोटी (D लायसन्स कोच) यांच्या मार्गदर्शनात फूटबॉलचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. मानकापुर अॅथलेटिक्स मैदान येथे सकाळी 06:00 ते 09:00 दरम्यान कोच गजानन ठाकरे (NIS कोच) यांच्या मार्गदर्शनात अॅथलेटिक्सचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. तर रामनगर म.न.पा. शाळा मैदान, रामनगर येथे सकाळी 06:00 ते 09:00 दरम्यान कोच गणेश बाळबुधे (वरिष्ठ खो-खो खेळाडू) यांच्या मार्गदर्शनात खो-खोचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे. तसेच लावा दाभा मैदान येथे सकाळी 07:00 ते 09:00 दरम्यान कोच शिवानी चौधरी (D लायसन्स कोच) यांच्या मार्गदर्शनात फूटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

उत्तर नागपुरात आसीनगर मैदान, कमाल चौक येथे सकाळी 06:00 ते 09:00 दरम्यान कोच अनस अख्तर (D लायसन्स कोच) यांच्या मार्गदर्शनात फूटबॉलचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच पंचवटी नगर मैदान, शितला माता मंदिर जवळ, बिनाकी, कांजी हाऊस चौक येथे सायंकाळी 05:00 ते 07:00 दरम्यान कोच शेरयाल अली (D लायसन्स

Advertisement
Advertisement