Published On : Wed, Dec 18th, 2019

मनपा महिलांसाठी ‘ ती बस ’ टॉयलेट निर्माण करणार

Advertisement

दोन टॉयलेट प्रायोगिक तत्तावर लवकरच सुरू करणार

नागपूर,: नागपूर महानगरपालिकेच्या जुन्या भंगार बसेसचा पुनर्वापर करून महिलांसाठी खास ती बस टॉयलेटचे निर्माण करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. या योजनेची माहिती जाणून घेण्यासाठी महापौरांनी बुधवारी (ता.18) मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

यावेळी महापौर संदीप जोशी यांच्यासह आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, परिवहन विभागाचे यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, साराप्लास्ट इंटरप्राईजेसचे शेखर कांत, संदीप जाट प्रामुख्याने उपस्थित होते.

मनपाद्वारे सुलभ शौचलाये निर्माण करण्यात आलेले आहे. पंरतु वर्दळी भागात, आठवडी बाजारात महिलांसाठी शौचालयासाठी अडचणी जातात. महिलांसाठी शौचालये उपलब्ध व्हावी यादृष्टीने परिवहन विभागाच्या जुन्या भंगार पडलेल्या बसेसेचा योग्य पुनर्वापर करून महिलांसाठी टॉयलेट बस निर्माण करण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले. या बसेस ला ‘ती बस’ असे नाव देण्यात येणार आहे.

Advertisement

प्रारंभीच्या काळात प्रायोगिक तत्तावर दोन बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. एक बस ही फिरती राहणार असून ही बस शहरातील वदर्ळीच्या ठिकाणी व आठवडी बाजारात, मार्केट परिसरात राहणार असून एक बस ही राहटे कॉलनी चौकात स्थीर राहणार आहे. अशा 50 बसेस मनपा निर्माण करणार आहे.

या बसेसमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह राहणार असून उरलेल्या थोड्या जागेत उपहारगृह ठेवण्यात येणार आहे. यामध्ये महिलांसाठी चहा, नास्ताची सोय त्यात राहील, अशी माहिती शेखर कांत यांनी दिली.

अशा प्रकारच्या बसेसमुळे महिलांसाठी शौचालयाचा प्रश्न सुटेल, असा विश्वास महापौरांनी यावेळी व्यक्त केला. दोन टॉयलेट बसेस लवकरात लवकर सुरू कराव्यात, असेही महापौरांनी यावेळी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.