| | Contact: 8407908145 |
  Published On : Sat, Jun 5th, 2021

  मनपातर्फे ७५ ऑक्सिजन उद्यान विकसित करणार : महापौर दयाशंकर तिवारी

  नागपूर : जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड करून शहरात ७५ ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी केली.

  शनिवारी (ता.५) जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने गांधीबाग उद्यानात १२०० प्राणवायू वृक्षांची लागवड करण्याची सुरूवात करण्यात आली. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक , उपायुक्त रवींद्र भेलावे, अमोल चौरपगार, श्री. नागमोते उपस्थित होते.

  यावेळी महापौर दयाशंकर तिवारी सांगितले, उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर येथे वृक्षांची संख्या फारच कमी आहे. मनपातर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात, खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल. येथे वनौषधी सुद्धा लावण्यात येतील. याचा लाभ आयुर्वेदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. पोहरा नदीच्या काठालगत सुध्दा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापौर व अन्य उपस्थित नागरिकांनी वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ केला.

  याप्रसंगी अधिवक्ता प्रकाश जयस्वाल, ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, नरेंद्र सतीजा, किशोर पालांदूरकर, रामभाऊ आंबुलकर उपस्थित होते.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145