Published On : Wed, May 23rd, 2018

लेटलतीफ कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही !

Virendra Singh at Dhantoli and Dharampeth Zone

नागपूर: झोन कार्यालयाची वेळ १० वाजताची आहे. कार्यालयीन वेळा पाळायलाच हव्या. दहा वाजतानंतर जो कर्मचारी येईल, त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला. बुधवारी (ता.२३) आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी धंतोली आणि धरमपेठ झोन कार्यालयाचा आकस्मिक दौरा केला. यावेळी त्यांच्यासमवेत अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता आयुक्त वीरेंद्र सिंह हे धंतोली कार्यालयात पोहचले. कुठलीही पूर्वसूचना नसताना आयुक्त झोन कार्यालयात आल्याने कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली. आयुक्तांनी आल्याबरोबरच झोन कार्यलायचे दरवाजे बंद केले. आतील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हालचाल वही तपासली. त्यावेळी विभागीय उपअभियंता एम.के.सिंग हे अनुपस्थित असल्याने आयुक्तांनी संताप व्यक्त करीत त्यांना निलंबित करण्याचे निर्देश दिले. दरवाज्याचा बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात यावी आणि त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे प्रस्ताव सादर करण्यात यावे, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

Advertisement

झोनमध्ये बायोमेट्रिक सिस्टीम लागू करण्यात यावी. कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती ही बायोमॅट्रिक पद्धतीने करण्यात यावी, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. दहा नंतर कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना यानंतर निलंबित करण्यात येईल, अशी तंबीही आयुक्तांनी यावेळी दिली. यावेळी त्यांच्यासमवेत झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, सहायक अधीक्षक श्रीकांत वैद्य उपस्थित होते.

धरमपेठ झोनमध्येही निलंबनाचे आदेश
धरमपेठ झोन कार्यालयात आयुक्त वीरेंद्र सिंह १०.१५ वाजता पोहोचले. तेथेही त्यांना कर्मचाऱ्यांची लेटलतिफी निदर्शनास आली. यावर त्यांनी संताप व्यक्त केला. असे जर नेहमीच होत असेल तर हे योग्य नाही. यापूर्वीही समज दिल्यानंतर असेच होत असेल तर आता गय करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी त्यांनी कर्तव्यावर वेळेवर न पोहोचणाऱ्या धरमपेठ झोनमधील चार आणि धंतोली झोनमधील एक अशा पाच जणांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Virendra Singh at Dhantoli and Dharampeth Zone
निलंबित केलेल्या कर्मचा-यांची नावे

१) मनोज सिंग – उपअभियंता (धंतोली झोन क्र.४)

२) एम.जी.भोयर – जलप्रदाय विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन, प्रकाश विभाग)

३) ए.एस.शेख – क्षेत्र कर्मचारी फायलेरिया विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन, प्रकाश विभाग)

४) नितिन झाडे – स्थापत्य अभियांत्रिकी लोककर्म विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन)

५) अनिल निंबोरकर – सुतार, लोककर्म विभाग (सध्या कार्यरत धरमपेठ झोन )

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement