Published On : Wed, Aug 25th, 2021

मनपा आयुक्तांनी केली संघर्षनगर ते चांदमारी मार्गाच्या कामाची पाहणी

Advertisement

रस्त्यावर ‘ट्रायल पिट’ करण्याचे निर्देश : कामाची गुणवत्ता तपासली

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे पूर्व नागपूरातील भांडेवाडी जवळील संघर्षनगर ते चांदमारी कडे जाणा-या रस्त्याची महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी बुधवारी (ता. २५) पाहणी केली. यावेळी त्यांनी स्वत: रस्त्याच्या कामाची गुणवत्ताही तपासली.

मनपातर्फे संघर्षनगर ते चांदमारीकडे जाणा-या दीड किलोमीटर अंतराच्या रोडचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्याच्या कामाकरिता मनपाकडून ८.९५ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. या कामामध्ये कुठल्याही प्रकारची गुणवत्तेबाबत तडजोड केली जाणार नसून कामाची गुणवत्ता तपासण्यासाठी रस्त्यावर ‘ट्रायल पिट’ करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी यावेळी दिले. जेसीबी द्वारे रस्त्यावर खड्डा करून करण्यात आलेल्या कामाची गुणवत्ता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी तपासली. सध्या या रोडवर डब्ल्यू.बी.एम.चे काम सुरु आहे.

यापूर्वी मनपा आयुक्तांनी भांडेवाडी डम्पिंग यार्डचा दौरा करुन तेथील कामाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी अधीक्षक अभियंता अजय पोहेकर, मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता धनंजय मेंडुलकर, सोनाली चव्हाण, राजेश दुफारे व अन्य उपस्थित होते.