Published On : Wed, Aug 25th, 2021
By Nagpur Today Nagpur News

युवा तर्फे मनपाला वैद्यकीय उपकरण भेट

नागपूर : यूथ फॉर यूनिटी ॲण्ड व्हॉलेंटरी ॲक्शन (युवा) संस्थे तर्फे नागपूर महानगरपालिकेला वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. मनपा तर्फे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी युवा चे सीनियर प्रोजेक्ट असोसिएट नितीन मेश्राम यांच्याकडून ही उपकरणे स्वीकारली.

युवा संस्थे तर्फे कोव्हिड-१९ विरुध्द च्या लढ्यामध्ये मनपाला लसीकरण, लसीकरण सहाय्य डेस्क, पेयजल आणि मल:निस्सारण आदी कार्यामध्ये मदत मिळाली आहे. युवा संस्थे १५ पेशंट मॉनिटर, १५ रक्तदाब मापक यंत्र, ४८ बायपॅप मास्क (नॉन व्हेंटेड), ४८ बायपॅप मास्क (व्हेंटेंड) तसेच ५ इफयूजन पम्प भेट देण्यात आले. ही मदत हेल्प युवर एन्जीओ तर्फे मिळाली आहे.

Gold Rate
May 04- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,50,400 /-
Gold 22 KT ₹ 1,39,900 /-
Silver/Kg ₹ 2,47,300/-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी मनपाला वैद्यकीय उपकरणाची मदत केल्याबद्दल युवा संस्थेचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, संभाव्य तिस-या लाटेच्यावेळी या उपकरणांची मोठी मदत होणार असल्याचे ते म्हणाले.

इंदिरा गांधी रुग्णालय गांधीनगर, आयसोलेशन रुग्णालय इमामवाडा आणि नागपूर विद्यापीठाचे जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, विद्यापीठ परिसर मध्ये प्रस्तावित कोव्हिड केअर सेंटरमध्ये याचा उपयोग केला जाईल.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेन्द्र बहिरवार, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, युवाचे निलेश खडसे, शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक आणि समन्वयक शैलेंद्र वासनिक उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement