Published On : Thu, May 24th, 2018

मनपा आयुक्त व स्थायी समिती सभापती यांनी केला जरिपटका भागाचा संयुक्त दौरा

Advertisement

Mpl Commi Inspection Jaripatka News Photos 24 May 2018

नागपूर: प्रभाग क्र. १ मधील जरिपटका परिसरात विविध समस्या जसे पाणी प्रश्न, स्वच्छता व इतर समस्येच्या संदर्भात म.न.पा. आयुक्त विरेंद्र कुंभारे यांनी स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा समवेत जनतेशी संवाद साधून विविध समस्या जाणून घेतले. यावेळी म.न.पा. दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय, नगरसेविका श्रीमती प्रमीला मथराणी, अप्पर आयुक्त रविंद्र कुंभारे, कार्यकारी अभियंता (ज.प्र) संजय गायकवाड, ओ.सी.डब्ल्यू. चे वितरण व्यवस्थापक राजेश कॉलरा, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, संजय चौधरी, ओ.सी.डब्ल्यूचे डेलीगेट रत्नाकर पंचभाई आदी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी प्रभागाचे नगरसेवक व स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा यांनी आयुक्त यांना जरिपटका भागात पाणी कमी प्रमाणात मिळते व पिण्याचे पाणी बरोबर मिळत नसल्याचे निर्देशनास आणून दिले. यावेळी मा. आयुक्त यांनी लगेच गुरुनानक सोसायटी, बाघाबाई ले-आऊट, ग्यानचंदानी लाईन, बाबा हरदास गल्ली, बचवाणी गल्ली, टहलराम किराणा दुकान परिसर,सिंधु नगर, जुना जरिपटका आदी भागातील फीरुन नागरिकांशी पाणी प्रश्नाबाबत थेट संवाद साधला या भागात पाणी पुरवठा बरोबर होत नसल्याचे निदर्शनास आले. तसेच विविध तक्रारीची मा.आयुक्त यांनी दखल घेऊन याभागात नळाच्या प्रेशर वाढवा, टॅकरच्या फे-या वाढवा तसेच याभागातील जनतेला मुबलक पाणी दररोज मिळण्याबाबत त्वरित उपाययोजना करा असे निर्देश कार्यकारी अभियंता संजय गायकवाड व ओ.सी.डब्ल्यू. चे वितरण व्यवस्थापक राजेश कॉलरा यांना दिले.

Advertisement

Mpl Commi Inspection Jaripatka News Photos 24 May 2018

यानंतर आयुक्तांनी परिसरातील स्वच्छतेच्या कार्याचे निरिक्षण केले. रस्त्यावरील चेंबरवर कव्हरची डागडूगी करा, रस्त्याच्या दोन्हीबाजूनी नियमित सफाई करा, रस्त्याच्या कडेला व फुटपाथवर कचरा त्वरित उचला, सफाई कर्मचा-यांना हातानी कचरा उचलण्याकरीता हॅडग्लोब व मास्कचा वापर करण्याची सुचना केली.

Mpl Commi Inspection Jaripatka News Photos 24 May 2018
यावेळी म.न.पा. आयुक्त यांनी जरिपटका येथील दयानंद पार्कमध्ये जावून तेथील जनसुविधेचा आढावा घेतला, बॅटमिंटन कोर्ट, ग्रीनजिम, वॉकींग ट्रॅक तसेच पार्किंग व शौचालयाचे निरिक्षण केले.

उदयानात येणा-या नागरिकांना कोणतेही त्रास होणार नाही व आवश्यक सुविधाबाबत दक्षता घेण्याचे निर्देश संबंधीत अधिका-यांना दिले.