Published On : Thu, Jun 25th, 2015

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्राची दिशाभूल!

 

विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप 
पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

Fadanvis
मुंबई। महिला व बालकल्याणविभागाच्या खरेदीतील गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याची दिशाभूलकरीत असल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्याच्या अनुषंगाने सदर विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने राजीनामा द्यावा,अशीही मागणी त्यांनी केली आहे.

सदरहू गैरव्यवहाराप्रकरणीकाँग्रेस पक्षाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी खासगी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये दि. 1 एप्रिल 2015पासून 1 कोटीहून अधिक रक्कमेची खरेदी दरपत्रकाप्रमाणे करता येणार नसल्याचे म्हटले आहे.परंतु, याच फडणवीस सरकारने दि. 26 नोव्हेंबर 2014 रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार3 लाख रूपयांहून अधिकची खरेदी केवळ ई-निविदेच्या माध्यमातूनच करण्याचे निश्चित केलेहोते. दि. 18 डिसेंबर 2014 रोजी जारी केलेल्या आणखी एका आदेशातही 3 लाख रूपयांहून अधिकचीखरेदी ई-निविदेच्या माध्यमातूनच करण्याच्या निर्णयाचा पुनरूच्चार करण्यात आला आहे.महिला व बालकल्याण विभागाने दि. 13 फेब्रुवारी 2015 रोजी केलेल्या खरेदीत दि. 26 नोव्हेंबर2014 च्या शासन निर्णयाचे उघड-उघड उल्लंघन केले असतानाही मुख्यमंत्री त्यावर पांघरूणघालण्याचा प्रयत्न का करीत आहेत, असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

सदर गैरव्यवहार प्रकरणीमहिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु, सदर चौकशीदरम्यान त्या मंत्रीपदावर कायम राहणार असतील तर ही चौकशी निष्पक्षपद्धतीने होऊ शकणार नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी तातडीने राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.