Published On : Wed, May 27th, 2020

वेबीनारच्या माध्यमातून महावितरण संवाद साधणार

Advertisement

Mahavitaran Logo Marathi

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० नंतर सुरू झालेल्या संपूर्ण बंदच्या परिस्थितीत महावितरणच्या विविध वर्गवारितील सर्व ग्राहकांच्या वीज पुरवठ्याविषयी समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणकडून वीज ग्राहकांसाठी शुक्रवार दिनांक २९ मे रोजी सकाळी ११ वाजता वेबीनारच्या माध्यमातून संवाद साधून त्यांच्या तक्रारीचे निराकरण करण्यात येणार आहे.

महावितरणच्या नागपूर परिमंडलातील वर्धा आणि नागपूर येथील औदयोगिक, वाणिज्य आणि घरगुती वीज ग्राहक यात सहभागी होऊ शकतील. सकाळी ११ वीज ग्राहक आपल्या वीज देयक, खंडित वीज पुरवठा आदींबाबत आपल्या तक्रारी थेट महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडू शकणार आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावमुळे सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने विविध तक्रार निवारण्यासाठी महावितरणच्या सर्व ग्राहकांशी संवाद साधण्याकरिता ‘वेबिनार’ किंवा व्हिडिओ कॉन्फरंन्सचे आयोजन करण्याचे आदेश राज्याचे ऊर्जा मंत्री. ना. डॉ. नितिन राऊत यांनी दिले आहे. या आदेशाची नागपुर प्रादेशिक विभागात ताबडतोब अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी दिल्यानंतर नागपूर परिमंडलाच्यावतीने सोशल डिस्टंन्सिंग काटेकोरपणे पाळत ऑनलाईनच्या माध्यमातून या ‘वेबिनार ‘संवादाचे आयोजन केले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

थेट ग्राहकांशी संवाद होणार असल्याने यावेळी ग्राहकांचा विजपुरवठा,विजबिल, वीज यंत्रणेची देखभाल दुरूस्ती आदीबाबत गाऱ्हाणी,प्रश्न ,अपेक्षा व अडचणी जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच यावेळी महावितरणच्या विविध सेवांची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ग्राहकांनी मांडलेल्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्यासाठी मुख्य अभियंतासोबत नागपूर आणि वर्धा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंते ,सर्व उपविभागीय अभियंते या वेबिनार संवादात सहभागी होणार आहेत.

‘वेबिनार’ संवादात असे सहभागी व्हावे:-

‘ वेबिनार ‘ संवांद हा सर्व वीज ग्राहक ,ग्राहक प्रतिनिधी ,पत्रकार अशा सर्वांसाठी असल्याने ज्यांना वीज समस्या किंवा सुचना मांडायच्या आहे त्या सर्वांना महावितरण चंद्रपुर परिमंडलाच्यावतीने गुरुवार दि २९ मे २०२० रोजी आयोजित या वेबिनारमधे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून

सहभागी होता येईल. ही लिंक आहे. https://meet.google.com/sgq-acyd-xcb अशी असून ज्या ग्राहकांकडे Google meet app डाऊनलोड केलेले नसेल त्यांनी सदर अँप गुगल प्ले स्टोअरमधुन डाऊनलोड करुन सदर लिंकवर क्लिक करुन या ‘वेबिनार’ सवांदात सहभागी व्हावे असे आवाहन नागपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement