Published On : Wed, May 27th, 2020

गौतम नगरात दूषित पाणी पुरवठा महिलांचे पाणी पुरवठा अधीक्षकांना निवेदन

Advertisement

कामठी : दुषित पाणी पुरवठा होत असल्या बाबत वारंवार तक्रारी करूनही नगर परिषद प्रशासनाने दुर्लक्ष केल्या मुळे प्रभाग १५ गौतम नगरातील महिलांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या अनुपस्थितीत पाणी पुरवठा अधीक्षक अभियंता अविनाश चौधरी यांना आज मंगळवारी दुपारी १२ वाजता निवेदन दिले

सुदर्शन नगर आणि गौतम नगर येथे जवळपास ३-४ महिन्या पासून दूषित पाणी पुरवठा होत असून यावर तातडीने उपाय योजना करावी अशी मागणी नगरसेविका संध्या रायबोले यांनी केली आहे

सुदर्शन नगर व गौतम नगरातील दूषित पाणी पुरवठा बाबत अनेकदा लेखी तक्रारी दिल्या कार्यवाही करु असे मोघम उत्तर प्रत्येक वेळी देण्यात आले परंतु कार्यवाही करण्यात आली नाही

गौतम नगर छावनी येथील सरीता सरोज,वैशाली गजभिये, सुरेखा चांदोरकर,शिल्पा नागदेवे,राजश्री रंगारी,बबिता गजबे,ललिता वाघमारे,नलिनी चांदपूरकर यांनी आज निवेदन देऊन जलवाहिनी तील गळती दुरुस्ती करून पिण्या योग्य पाण्याचा योग्य दाबाने पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे

बॉक्स-सैलाबनगर येथून येणारी पाइप लाइन लिकेज असल्याने दूषित पाणी पुरवठा होत असल्याची माहिती न प पाणी पुरवठा विभागाला असूनही उपाय योजना करण्यात येत नाही नागरिकांच्या जिविताशी न प प्रशासन खेळत आहे असा आरोप नगरसेविका संध्या रायबोले यांनी प्रतिनिधिशी बोलताना केला

संदीप कांबळे कामठी