Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Thu, Oct 18th, 2018

महावितरण अभियंतापदासाठी २०आणि २१ रोजी ऑनलाईन परीक्षा

नागपूर: महावितरणमध्ये पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी येत्या २० आणि २१ ऑक्टोबर २०१८ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी दिनांक २० रोजी सकाळच्या सत्रात तर पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) पदासाठी २१ रोजी सकाळ आणि दुपार अश्या दोन सत्रात ही परीक्षा होईल. विदर्भातील नागपूर,चंद्रपूर आणि अमरावती येथील १३ केंद्रावर या परीक्षा होणार आहेत.

पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी) आणि पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना आवंटीत केलेल्या परीक्षा केंद्राची माहिती प्रवेश पत्रावर देण्यात आली आहे. उमेदवाराने त्याचे प्रवेशपत्रावर स्वतःचा फोटो चिटकवून सोबत प्रवेश पत्रावरील असलेल्या नावाचे मूळ ओळखपत्र (ओळखपत्राचा सविस्तर उल्लेख प्रवेशपत्रावर केला आहे.)त्याच्या छायाप्रतीसह परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी सकाळच्या सत्रात सकाळी ९.१५ वाजेपूर्वी तर दुपारी १.१५ पूर्वी दाखल होणे आवश्यक आहे. उशिरा येणाऱ्या किंवा मूळ ओळखपत्र आणि सोबत त्याची छायाप्रत सोबत नसलेल्या उमेदवारांना केंद्राच्या आत प्रवेश करता येणार नाही.

नागपूरातील ५ केंद्रावर पदवीधर अभियंता (प्रशिक्षणार्थी)पदासाठी २,६३२ तर कनिष्ठ अभियंता पदवीका अभियंता (प्रशिक्षणार्थी) या पदासाठी ३,९५४ उमेदवार परीक्षा देणार आहेत.अमरावती केंद्रावर १२५४ पदवीधारक तर २१७१ पदविकाधारक उमेदवार ४ केंद्रावर तर चंद्रपूर केंद्रावर ३८५ पदवीधारक ७६० पदविकाधारक उमेदवार ४ केंद्रावर परीक्षा देणार आहेत.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145