Published On : Mon, Aug 21st, 2017

महावितरण देणार नवीन वीजजोडणीकरिता घरपोच सेवा

Advertisement

Maha-vitran

नागपूर: ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे अशा इच्छुंक ग्राहकांसाठी ‘कनेक्शन ऑन कॉल सेवा’ महावितरणतर्फे सुरूं करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.

नवीन वीजजोडणी सुलभतेने मिळांवी तसेच याबाबत तक्रार असल्यास ती तातडीने सोडविली जावी तसेच ग्राहकांच्या नावात बदल करणे सुलभ व्हावे यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार मुंबई येथील प्रकाशगड मुख्यालयात एप्रिल २०१७ पासून विशेष मदत कक्ष सुरूं करण्यात आला आहे. या कक्षाचा आतापर्यन्त सुमारे ७९२ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. ग्राहकांचा प्रतिसाद बघून या विशेष कक्षाची व्याप्ती आणखी वाढविण्यात आली आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी या ग्राहकाची सविस्तर माहिती घेतील. त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळंविण्यात येईल. त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीजजोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन स्वतः या ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरूंन घेतील. यावेळंी कर्मचारी ग्राहकाचे सर्व विहित कागदपत्रे घेतील आणि त्याला लवकरात लवकर वीजजोडणी देण्याचा प्रयत्न करतील.

नवीन वीजजोडणीसाठी इच्छूंक असणार्‍या ग्राहकाला ओळंखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळंखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहनपरवाना, फोटोपास (शासन मान्यताप्राप्त छांयाचित्रीत ओळंखपत्र), खरेदी विक्री कराराचे छांयाचित्र असलेले ओळंखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळंखपत्र यापैकी एक तसेच पत्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक करपावती, सक्षम शासकीय अधिकारी यांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणत्र (अर्जदार भाडेकरूं असल्यास), शासनाने दिलेले मालमत्ता कार्ड किंवा ७/१२ चा उतारा, इत्यादीपैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचार्‍याकडे द्यावे लागणार आहे.

नवीन वीजजोडणीसाठी इच्छूंक ग्राहकाने मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे ०२२-२६४७८९८९ व ०२२-२६४७८८९९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.

Advertisement
Advertisement