Published On : Mon, Jan 27th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मृण्मयी, समीरला सुवर्ण पदक खासदार क्रीडा महोत्सव स्केटिंग स्पर्धा

Advertisement

नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील स्केटिंग स्पर्धेमध्ये मृण्मयी चावरे आणि समीर वानखेडे यांनी सुवर्ण पदक पटकाविण्याची कामगिरी केली. गणेश नगर स्केटिंग रिंक येथे ही स्पर्धा पार पडली.

इनलाईन आणि क्वाड या प्रकारामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. इनलाईनमध्ये 14 वर्षावरील मुली आणि मुलांच्या गटामध्ये मृण्मयी आणि समीरने सुवर्ण पदक पटकाविले. मुलींच्या स्पर्धेत खुशी लखोटीया आणि हरगुन लोटे ने रौप्य व कांस्य पदक पटकाविले. तर मुलांच्या स्पर्धेत प्रयास कोमजवार ने रौप्य आणि सुजल बागडे ने कांस्य पदक प्राप्त केले.

Gold Rate
25 April 2025
Gold 24 KT 96,300 /-
Gold 22 KT 89,600 /-
Silver / Kg 97,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

क्वाड प्रकारात 14 वर्षाखालील मुलींच्या स्पर्धेत शिवानी शेट्टी ने सुवर्ण पदक पटकाविले. तर ईश्वरी मोहोड ने रौप्य आणि कनक इंगळे ने कांस्य पदक प्राप्त केले. 14 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धेत अथर्व राडके ने पहिला क्रमांक प्राप्त केला. चेतस चाहंदे दुसरा आणि मंदर देशमुख तिसरा आला.

निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)

(इनलाईन)

14 वर्षावरील मुली : मृण्मयी चावरे, खुशी लखोटीया, हरगुन लोटे

14 वर्षावरील मुले : समीर वानखेडे, प्रयास कोमजवार, सुजल बागडे

14 वर्षाखालील मुली : ऋतुजा कापगते, मिहिका आगाशे, लारिशा काशीकर

14 वर्षाखालील मुले : शार्विल पंदीलवार,आदित्य निकुळे, क्रितीक एस.जे.

12 वर्षाखालील मुली : श्रावणी हटवार,स्वरा ठाकरे, कृतिका डेहनकर

12 वर्षाखालील मुले : सिद्धार्थ मातोळे, अथर्व कुकडे, अरहान बाबडे

10 वर्षाखालील मुली : धनिष्ठा सोनेकर, शुभ्रा डोंगरे, त्रिशा भुजडे

10 वर्षाखालील मुले : विहान भारंबे, समर्थ चव्हाण, अयांश परिहार

8 वर्षाखालील मुली : आशी महाजन,अभिश्री नावले, परणिका तळेकर

8 वर्षाखालील मुले : वीर भाणारे, सर्वांग कुंभारे, कृष्णा हेडाव

(क्वाड)

14 वर्षाखालील मुली : शिवानी शेट्टी, ईश्वरी मोहोड, कनक इंगळे

14 वर्षाखालील मुले : अथर्व राडके, चेतस चाहंदे, मंदर देशमुख

12 वर्षाखालील मुली : आयशा नौरंगा, गार्गी पराते, लावण्य मांकवडे

12 वर्षाखालील मुले : आरव मेटकर, शार्दुल भुंबार, मयंक वानखेडे

10 वर्षाखालील मुली : काव्या सोनकुसरे, शिरीशा कोंडाई,उन्नती नागपुरे

10 वर्षाखालील मुले : रुद्र घटोळे,लक्षित खंडित, लक्ष सुरे

8 वर्षाखालील मुली : आर्वी उघाडे, कियाना मोरे, गार्गी

8 वर्षाखालील मुले : प्रभास मिसाळ, निमिश लोटेकर, मोहनिश पंचबुद्धे

Advertisement
Advertisement