नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ६३ किलोवरील वजनगटामध्ये अल्फिया शेख ने सुवर्ण पदक पटकाविले. संत सतनामी महाराज समाज भवन मिनी मातानगर कळमना येथे ही स्पर्धा सुरु आहे.
स्पर्धेत ६३ किलोवरील वजनगटामध्ये शुभांगी सूर्यवंशी ने रौप्य आणि विधि खंडेलवाल ने कांस्य पदक पटकाविले. पुरुषांच्या मास्टर्स गटात नवनीत खत्री ने सुवर्ण, सचिन कलनाके ने रौप्य आणि धीरज टेंभुर्णे ने कांस्य पदक पटकाविले. ६३ किलो वजनगटामध्ये वर्षा शेलके, पायल नागले आणि अनुष्का ठेंगरे यांनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त केले. ५२ किलो वजनगटामध्ये धनश्री गजभिये ने सुवर्ण, रोहिणी मेश्राम ने रौप्य आणि सलोनी कांतोले ने कांस्य पदकाची कमाई केली.
यापुर्वी स्पर्धेचे संत सतनामी महाराज समाज भवन मिनी मातानगर कळमना येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी माजी नगरसेवक अनिल गेंडरे, विदर्भ ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव डॉ. श्रीकांत वरणकर, खासदार महोत्सव समितीचे सहसंयोजक सचिन माथने, अनुज कोसरे आदी उपस्थित होते.