Published On : Mon, Sep 16th, 2019

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत मृणाल बघेल प्रथम

काटोल येथे होणाऱ्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड

कामठी:-राज्य बहुविध क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी नागपूर यांच्या वतीने विभागीय क्रीडा संकुल मानकापूर नागपूर येथे आयोजित जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी चा मृणाल बघेल याने प्रथम क्रमांक सुवर्ण पदक पटकाविले

सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकणारा मृणाल बघेल याने 17 वर्षे वयोगटात 54 किलो वजन गटात बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून काटोल येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत मृणाल बघेल नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत मृणाल बघेल च्या विजयाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्र बागडे ,क्रीडा विभाग प्रमुख डॉ इंद्रजीत बसू डॉ प्रशांत बांबल यांनी अभिनंदन केले असून कामठी तालुका बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष पंकज नारडेलवार यांचे मृणाल बघेल याला मार्गदर्शन लाभले

संदीप कांबळे कामठी