Published On : Thu, Oct 28th, 2021

कामठीच्या श्री टाॅकीजला लागलेल्या आगीत कोट्यवधीचे नुकसान झाल्याचा दावा

Advertisement

नागपूरः कामठी येथील श्री टाॅकीजला बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास आग लागली. तेथील काळजीवाहकाने मालक राजेश शर्मा यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्या नंतर कामठी येथून २ व नागपूर येथून ३ ते ४ अग्निशमनदलाच्या गाड्यांनी आग विझवली. श्री टाॅकीज गेल्या १८ महिन्यांपासून बंदच आहे. दिवाळी नंतर सुरू करण्याचा विचार होता. पण, ही दुदैवी घटना घडली असे शर्मा यांनी सांगितले. या आगीत सुमारे दीड ते दाेन कोटींचे नुकसान झाल्याचा दावा शर्मा यांनी केला आहे. आगीत फर्निचर, उपकरणे, सिलींग, डाॅल्बी डिजिटल सिस्टिमसह सर्व जळून खाक झाल्याचे ते म्हणाले. बहुतेक शाॅर्ट सर्किट कारण असावे असे बोलले जाते. २२ आॅक्टोबर रोजी ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत टाॅकीज सुरू झाल्या.