Published On : Fri, Sep 25th, 2020

धनगर ST आरक्षणासाठी खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांचे ढोल बजाओ आंदोलन

Advertisement

नागपुर – ठाणे-महाराष्ट्रातील धनगर ST आरक्षणाचा मुद्दा गेली 70 वर्षांपासून प्रलंबित आहे. केवळ ‘धनगर’ ऐवजी ‘धनगड’ लिहिल्या गेल्यामुळे धनगर जमात ST आरक्षणापासून वंचित राहिली आहे. दऱ्या खोऱ्यात मेंढपाळ धनगर अन्यायग्रस्त व अतिशय हलाखीचे आयुष्य जगत आहेत.

समाजाच्या संयमाचा अंत झालेला आहे. कोरोना च्या कठीण परिस्थितीतही, काही पर्याय नसल्याने राज्यभर ठिकठिकाणी आज ‘ *ढोल बजाओ* ‘ आंदोलन घेण्यात आले. *राज्यभरातील सर्व संघटना, समित्या यांनी एकत्र येऊन तालुका व जिल्हा पातळीवर हे आंदोलन करावे असे आवाहन खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी केले होते.* त्याला भक्कम प्रतिसाद मिळून हे राज्यव्यापी आंदोलन यशस्वीपणे करण्यात आले.

Gold Rate
29 April 2025
Gold 24 KT 96,200/-
Gold 22 KT 89,500/-
Silver / Kg 97,200/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यात सर्व संघटना, समित्या आणि संपूर्ण धनगर समाजाचाच नव्हे तर या आरक्षणाला पाठींबा देणा-या अनेकांचा सहभाग होता.

खासदार पद्मश्री डाॅ विकास महात्मे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, माजी आमदार व भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्नमुख नरेन्द्र पवार यांनीही ढोल वाजवून आंदोलन केले. कोरोना महामारी मुळे, नियमांचे पालन करून हे आंदोलन झाले. यावेळी सर्वश्री ज्ञानेश्वर परदेशी, संतोष आव्हाड, अशोक शेळके, राजू बर्गे, निहारिका गोंदले, विशाखा खताळ, डाॅ. अरूण गावडे, राजेन्द्र पांढरे, अक्षय मासाळ, भास्कर यमगर, दीपक कुरकुंडे व इतर अनेक कार्यकर्ते सहभागी झाले.

आंदोलना नंतर जाण्याचे जिल्हाधिकारी यांचेकडे मुख्यमंत्रांकडे पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात महाराष्ट्रातील धनगर जमातीस त्वरित ST आरक्षण लागू करावे. तसेच राज्याच्या अर्थसंकल्पात धनगर जमातीसाठी केलेल्या एक हजार कोटी निधीच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली .

Advertisement
Advertisement