Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Sep 25th, 2020

  आरोग्यमंत्री राजेश टोपे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून नागपूर मेडिकल कॉलेजची पाहणी

  नागपूर : : नागपुरातील वाढत्या रुग्ण संख्येला बघता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना आजाराला समर्पित खाटांची उपलब्धता वाढविण्यात यावी, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले.

  आज सकाळी साडेदहा वाजता त्यांनी नागपूर येथील शासकीय रुग्णालयातील कोविड रुग्णांची वैद्यकीय व्यवस्था असणाऱ्या कक्षाला भेट दिली. या ठिकाणच्या सुविधांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मेडिकलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. नागपूर व विदर्भातील मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण नागपूर येथे मेडिकलमध्ये दाखल होतात त्यांना कोणत्याही परिस्थितीत खाटांची उपलब्धता असली पाहिजे.

  त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत रुग्ण परत जाता कामा नये. तसेच त्याला योग्य ते उपचार मिळाले पाहिजे. त्यासाठी केवळ कोविड समर्पित खाटांची संख्या मेडिकलमध्ये वाढविण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

  यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषधी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी वैद्यकीय व्यवस्था, औषधांची उपलब्धता, ऑक्सिजनची उपलब्धता, मुबलक प्रमाणात खाटांची उपलब्धता या सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्याचे निर्देश दिले. तसेच यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कंत्राटी तत्त्वावर तातडीने कार्यान्वित करण्यात यावे, असेही स्पष्ट केले

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145