Published On : Wed, Mar 22nd, 2017

शिवसेना खासदाराची पोलिसाला शिविगाळ; पकडली कॉलर

औरंगाबाद: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा एकदा कायदा हातात घेतला आहे. आपली वक्तव्ये आणि कृती यांमुळे यापूर्वीही अनेकव वेळा चर्चेत आलेले खैरे यांनी एका पोलीस कॉन्स्टेबलची कॉलर पकडत त्याला शिविगाळ केली. या कृत्यामुळे खा. खैरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीवेळी मंगळवारी हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होती. या निवडीवेळी शिवसेना कार्यर्ते मोठ्या प्रमाणात उत्साहात होते. या उत्साहात त्यांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरूवात केली. दरम्यान, परिसरातील तणाव वाढू नये तसेच, कोणताही अनुचीत प्रकार घडून नये यासाठी पोलिसांनी नियमांचे पालन केले. जिल्हा परिषद सदस्याचे ओळखपत्र पाहूनच पोलीस त्यांना निवड प्रक्रिया सुरू असलेल्या स्थळी सोडत होते. त्यामुळे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारावरच रोखले. यावेळी राग अनावर झालेल्या खैरे यांनी पोलीसांनाच शवीवगाळ केली. या त्यांनी एका पोलीसाची कॉलरही पकडली. हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबद्धल प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रीया व्यक्त करताना खा. खैरे म्हणाले, भाजपने पोलिसांना हाताशी घेऊन शिवसेनेच्या सदस्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळी सभागृहात पोहोचू न देण्याचे षडयंत्र आखले होते. त्यामुळेच आपल्याला अनुचित कृती करावी लागली, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.